तुळजामातेची निद्राकाळातील पूजा

Share This Post

अश्विन प्रतिपदा ते अश्विन पौर्णिमा या मध्ये तुळजापूर येथे सर्वात शुभ सण साजरा केला जातो. या काळात तुळजाभवानी माता निद्रिस्थ होत असते. हा काळ सहसा सव्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान येतो. दस-याच्या सिमोलंघन सोहळयानंतर तुळजाभवानी मातेला विधीवत पूजा करून सिंहासना वरून शेजघरातल्या पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते. मग भक्तांना दसरा ते कोजागिरी पौर्णितमा या काळात देवीचे निद्रा अवस्थेतील दर्शन होते . देवी जेव्हा निद्रा अवस्थेत असते त्या वेळेची पूजाविधी नेहमीपेक्षा वेगळा असते. याकाळात देवीला पंचामृताने अभिषेक केला जात नाही तर याकाळात देवीला दोन वेळा सुवासिक तेल व अत्तराने अभिषेक केला जातो. नंतर देवीच्या मूर्तीला तेलाने मालिश करून तिचा श्रमपरीहार केला जातो. हे तेल पूजारी भक्तांना प्रसाद म्हणून वाटून देतात. त्यानंतर देवीला महावस्त्र, साडी व पांघरूण घातले जाते. देवी निद्रा अवस्थेत असताना तिला फक्त नथ आणि डोळे इतकेच अलंकार घातले जातात. नंतर देवीचा मळवट भरून फुलांचा मुकुट चढवला जातो व पुष्पअलंकार घातले जातात. त्या नंतर देवीला नैवैद्य दाखवून धूपार्ती केली जाते. आरती झाल्यावर मग देवीच्या मोकळया सिंहासनासही आरती करून अंगारा ओवाळला जातो. अशा प्रकारे निद्राकाळात देवीची दिवसातून दोन वेळा पूजा पार पाडली जाते याकाळात वापरण्यात येणा-या तुळजाभवानी देवीचा पलंग खास असतो . हा पलंग आणण्याचा मान आज अनेक शतके नगर शहरातील पलंगे घराण्याला आहे. पलंग बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पलंगे कुटुंबीय ठाकूर कुटुंबियांना पुरवतात. भागवत कुटुंबीय पलंगाची जोडणी करत असतात. नंतर हा पलंग जुन्नर येथिल शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला आणला जातो. तेथे पलंगावर गादीची स्थापना होते. मग हा पलंग जुन्नर, पालनेर, नगर मार्गाने तुळजापूरला दस-याच्या आदल्या दिवशी पोहोचतो. मग पहाटे दस-याला देवी पलंगावर निद्रा घेते.

More To Explore

तुळजापूर मंदिर, देवी तुळजा भवानी, कुलदेवी दर्शन आणि भक्त निवास
Uncategorized

श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथे शाकंभरी नवरात्र महोत्सव (२०२५–२०२६)

शाकंभरी नवरात्र महोत्सव २०२५–२०२६ (दिनांक २० डिसेंबर २०२५ ते ०४ जानेवारी २०२६) महाराष्ट्राची कुलदैवत, आई श्री तुळजाभवानी माता, हिच्या पवित्र चरणी अर्पण केलेला शाकंभरी नवरात्र

तुळजापूर मंदिर, देवी तुळजा भवानी, कुलदेवी दर्शन आणि भक्त निवास
Uncategorized

तुळजापूर प्रवास: या ५ गोष्टी माहीत नसतील, तर तुमचा अपूर्ण राहील! मंदिर, भक्त निवास बुकिंग आणि पर्यटन टिप्स

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी! लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजापूर मंदिर येथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. हे एक शक्ती पीठ असून, छत्रपती शिवाजी

You cannot copy content of Tulja Bhavani Pujari