भारताच्या इतिहासात पौराणिक काळापासून घडत आलेल्या घटनांचे आजही पुरावे मिळतात. रामायण कालीन काही मंदिरे आजुनही भारतभर आढळतात. या काळातील मूर्ती, शिलालेख, शिवलिंग आणि याबाबत पिढ्यानुपिढ्या प्रचलित अशा रोचक कथाही प्रसिद्ध आहेत. अशीच तुळजापूरातही राम आणि लक्ष्मणाची अतीपूरातन अशी मंदिरे आहेत आणि याबाबत काही रोचक कथाही प्रचलित आहेत. तुळजापूरात राम आणि लक्ष्मण यांनी वास केला होता आणि यावेळी तुळजामातेने त्यांना दर्शन देउन मार्गदर्शन कले तसेच आर्शिवादही दिला होता. तुळजापूरात हीच रामायणकालीन शिवमंदिरे जणू हाच इतिहास कथन करण्यासाठी आजुनही पाय रोउन उभी आहेत. आजही येथे मनोभावे पूजन अर्चन होत असते. श्री रामेश्वर, श्री लक्ष्मणेश्वर आणि सितामंदिर या नावाने प्रसिद्ध ही शिव मंदिरे यांना अनन्यसाधारण असे ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. त्रेतायुगात ज्या स्थळी राम लक्ष्मण यांना तुळजामातेने दर्शन दिले आणि मौलिक असे मार्गदर्शन केले त्याच स्थळी ही मंदिरे उभारण्यात आली आहेत. प्रत्यक्ष राम आणि लक्ष्मण यांनी स्वहस्थे या जागी शिवलिंगांची स्थापना केली आहे. स्कंद पूराणात या मंदिरांचा उल्लेख आढळतो. या जागी मातेने राम लक्ष्मण यांना लंकेचे आणि सितामातेचे दर्शन करवले होते. म्हणून या ठिकाणी सिता मातेची मूर्तीही आपल्याला आढळते. हि दोन्ही मंदिरे अती प्राचिन असून हेमाडपंथी शैलित आपल्याला बांधलेली दिसतात. अतिशय रम्य अशी ही शिवमंदिरे ही इतिहासाची स्मृती स्थाने आहेत तसेच भवानीमातेचे अनन्यसाधारण सामर्थ याचीं प्रतिके आहेत.
Uncategorized
देव दर्शनासाठी मंदिरात गेलेच पाहिजे, असा आपल्या पूर्वजांचा हट्ट का होता? देव चराचरात आहे असे आपले संत सांगतात, तरीदेखील मंदिरात जा असाही आग्रह का धरतात त्याबद्दल माहिती करून घेऊ!
पूर्वीच्या तुलनेत मध्यंतरी लोकांचे मंदिरात जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु आता पुन्हा हळूहळू धर्म जागृती होत आहे तसे लोकांचामंदिरात जाण्याचा कल वाढू लागला आहे.