शिवराय हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अंगात एक तऱ्हेचे स्फुर्ती चढते. हे नाव ऐकताच डोळयासमोर उभा राहतो तो हिंदवी स्वराज्यासाठी जीवाची पर्वा नकरता लढणारा एक अपार कतृत्वाचा मर्दमराठा. ज्याच्या तलवारीला फक्त दुष्टांचा नाश करण्याचा ध्यास लागला होता. जणू हराजोपटीने तेजस्वी अशा त्यांच्या तलवारीला दैवी शक्ती लाभली आणि त्या तळपत्या पात्याने बलाढय शस्त्रूला नेस्तनाबूत करून इतिहास रचला. मग हे अशक्यप्राय वाटणारे कार्य करणारे ते पाते नक्कीच दैवी असणार असे वाटणे साहजिकच आहे. हो! शिवाजी महाराजांच्या तलवारी बाबत असे म्हंटले जाते की ती तलवार भवानी मातेने त्यांना प्रसाद रूपात प्रदान केली होती. म्हणूनच या तलवारीला भवानी तलवार असे संबोधतात. भवानी मातेचा महिमा समस्त महाराष्ट्राने वेळोवेळी अनुभवला आहेच. मग शिवरायांचीही मातेवर अपार श्रद्धा होती. मूळातच शूर असलेल्या शिवरायांना जेव्हा भवानी मातेचा वरदहस्त लाभला तेव्हा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला गेला. महिषासुरा सारख्या दानवाला नेस्तनाबूत करून समस्त विश्वाला तारणाऱ्या तुळजामातेचा वरदहस्त ज्याला लाभतो त्याच्या तलवारीला अपार शक्ती लाभणार नाही असे कसे शक्य आहे?
Uncategorized
महाकुंभ 2025: व्यवस्थापनाची किमया आणि जागतिक आकर्षण
महाकुंभ: जगातील सर्वात मोठा मेळामहाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर व्यवस्थापन, समन्वय आणि मानवी संसाधनांची परीक्षा असलेला जागतिक स्तरावरील कार्यक्रम आहे. 2025 मध्ये होणारा