तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे मंदिर हे हेमाडपंथी शैलित तयार केलेले दिसते आणि मातेच्या मंदिराचे शिखर हे अत्यंत कलाकुसरीने बनवलेले आहे तुळजापूरच्या मंदिराचे हे शिखर अत्यंत नयनमनोहर असून त्यावर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. अगदी दूरूनसुद्धा हे शिखर आपले लक्ष वेधून घेते. जसे हे मंदिर अति पूरातन आहे तसेच या मंदिराच्या बाबत अनेक रोचक कथाही आपल्याला ऐकायला मिळतात. या मंदिर वास्तूत अनेक शतके अनेक घटना घटत आल्या आहेत ज्यामुळे मातेवरची भक्तांची श्रद्धा अधिकच दृढ होत जाते. या शिखर आणि कळसाच्या बांधकामाबाबत अशीच एक रोचक कथा प्रसिद्ध आहे . बीड चे एक भक्त रंगोबा नाईक ठिगळे यांनी त्यांच्या परिवाराच्या समृद्धी आणि सुरक्षितते साठी आई तुळजाभवानी कडे साकडे घातले होते. त्यांची वंश वेल वाढण्यासाठी आणि समस्त परिवाराला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी तुळजाआई कडे नवस केला होता. जर नवस पूर्ण झाला तर तूझे शिखर वाढवीन आणि कळस चढवीन असे तुळजाआईला वचन दिले होते. त्यांचा नवस पूर्ण झाला आणि आई भवानी त्यांच्या नवसास पावली. आईच्या आर्शिवादाने त्यांची वंश वेल वाढली आणि समस्त परिवाराला सौख्य आणि आरोग्य प्राप्त झाले. मग नवस फेडण्यासाठी रंगोबा ठिगळे यांनी देवीच्या मंदिराच्या शिखराचे बांधकाम पूर्ण केले. आणि त्यावर 27 शेर सोन्याचा कळस चढवला. आजुनही रंगोबा नाईक ठिगळे यांचे वंशज तुळजा भवानीची उपासना करतात.
Uncategorized
मकरसंक्रांती 2025: सणाचे महत्त्व आणि यावर्षीचे वैशिष्ट्ये
मकरसंक्रांती 2025: सणाचे महत्त्व आणि यावर्षीचे वैशिष्ट्ये मकरसंक्रांती हा भारतातील एक प्रमुख सण असून, निसर्गातील बदल आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे.