छोटा दसरा म्हणून होते शाकंभरी नवरात्र महोत्सवाची गणना, जय्यत तयारी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजा भवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी प्रारंभ होणार आहे.
मातेच्या सायंकाळच्या नित्य पूजेची घाट ५.३० वाजता होवून सकाळची पूजा विसर्जित करून मुख्य मुर्तीला पंधरा ते वीस मिनिटे पंचामृत अभिषेक घालण्यात आल्यानंतर चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठित असलेल्या मुर्ती भोवतीचे मेन काढण्यासह मातेची शोड्षोपचार पूजा पार पडून नैवेद्य, धुपारती, अंगारा पार पडणार आहे. त्यानंतर मातेची मुख्य
पलंगावर निद्रिस्त करण्यात येत आहे.सात निद्रा दररोज सायंकाळी मातेची छबिना मिरवणूक
पूर्ण करून आठव्यादिवशी मंगळवारी (७ जानेवारी २५) पहाटे मातेची मुख्यमुर्ती सिंहासनावर आरूढ केली जाणार आहे. त्याचदिवशी दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे.
सायंकाळी मंदिर परिसरात मातेची छबिना मिरवणूकही पार पडणार आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सवाला छोटा दसरा म्हणूनही गणले जाते. मातेच्या येत्या सात दिवसाच्या निद्रा काळात मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक बंद राहणार असून मुर्तीला सकाळ-संध्याकाळ सुगंधी तेल लावण्यात येणार असल्याने भाविकांना मातेच्या
मुर्ती सिंहासनावरून हलविण्यात येवून सिंह गाभाऱ्यानजीकच्या शेजघरातील चांदीच्या मुख व धर्म दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
या नवरात्रौत्सवात ११ ते १४ जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी मातेची छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण समजला जाणारा जलयात्रेच्या मिरवणुकीचा सोहळा शनिवार ११ जानेवारी रोजी पार पडणार आहे. पापनास तीर्थापासून निघणाऱ्या शाकंभरी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक यंदाही वाहनातून काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुळजापुरात भाविकांची मोठी मांदियाळी पहावयास मिळणार आहे.
आजपर्यंत स्थानिक तिन्ही पुजारी संघटना एकत्रित येऊन मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरा करीत आल्या असून यावर्षी मात्र या सोहळ्याचे यजमानपद पाळीकर पुजारी संघटनेला देण्यात आले आहे. यामध्ये मंदिर संस्थानही महत्वाची भुमिका बजावते. ७ जानेवारीला पहाटे मुख्य मूर्तीची सिंहासनावर
पूर्नप्रतिष्ठापना करण्यात येवून त्याचदिवशी दुपारी बारा वाजता मंदिरातील पिंपळ पारासमोरील गणेश विहार ओवरीमध्ये शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर यजमानांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात घटस्थापनेचा विधी होत आहे.
Uncategorized
तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस आज प्रारंभ
छोटा दसरा म्हणून होते शाकंभरी नवरात्र महोत्सवाची गणना, जय्यत तयारीमहाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजा भवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी (३१