शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पाले भाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडल.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे.”
शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 08 जानेवारी सुरू होत आहे याला शाकंभरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव ‘बनशंकरी’ असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोटा रथोत्सव असतो.