
महिषाशूर मर्दिनी अलंकार पुजा
ज्यावेळी स्वर्ग लोकांतून महिषाशूराने सर्व देव देवता गणास हाकलून दिले व एकटाच स्वर्गाचा आनंद घेवू व भोगू लागला.साक्षात पार्वती अवतार असलेली आई तुळजा भवानी माता सर्व देवतांच्या व ब्रह्म विष्णू महेश यांच्या तेजातून उत्पन्न झालेली हीच ती भवानी दुर्गा.हिनेच नऊ दिवस महिषाशुराशी युध्द खेळून विजय संपादन करून ठार मारले.याची ही अलंकार पुजा मांडली जात असते.