श्री तुळजाभवानी माता मंदिर शिखर आणि कळस

Share This Post

तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे मंदिर हे हेमाडपंथी शैलित तयार केलेले दिसते आणि मातेच्या मंदिराचे शिखर हे अत्यंत कलाकुसरीने बनवलेले आहे तुळजापूरच्या मंदिराचे हे शिखर अत्यंत नयनमनोहर असून त्यावर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. अगदी दूरूनसुद्धा हे शिखर आपले लक्ष वेधून घेते. जसे हे मंदिर अति पूरातन आहे तसेच या मंदिराच्या बाबत अनेक रोचक कथाही आपल्याला ऐकायला मिळतात. या मंदिर वास्तूत अनेक शतके अनेक घटना घटत आल्या आहेत ज्यामुळे मातेवरची भक्तांची श्रद्धा अधिकच दृढ होत जाते. या शिखर आणि कळसाच्या बांधकामाबाबत अशीच एक रोचक कथा प्रसिद्ध आहे . बीड चे एक भक्त रंगोबा नाईक ठिगळे यांनी त्यांच्या परिवाराच्या समृद्धी आणि सुरक्षितते साठी आई तुळजाभवानी कडे साकडे घातले होते. त्यांची वंश वेल वाढण्यासाठी आणि समस्त परिवाराला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी तुळजाआई कडे नवस केला होता. जर नवस पूर्ण झाला तर तूझे शिखर वाढवीन आणि कळस चढवीन असे तुळजाआईला वचन दिले होते. त्यांचा नवस पूर्ण झाला आणि आई भवानी त्यांच्या नवसास पावली. आईच्या आर्शिवादाने त्यांची वंश वेल वाढली आणि समस्त परिवाराला सौख्य आणि आरोग्य प्राप्त झाले. मग नवस फेडण्यासाठी रंगोबा ठिगळे यांनी देवीच्या मंदिराच्या शिखराचे बांधकाम पूर्ण केले. आणि त्यावर 27 शेर सोन्याचा कळस चढवला. आजुनही रंगोबा नाईक ठिगळे यांचे वंशज तुळजा भवानीची उपासना करतात.

More To Explore

शारदीय नवरात्र २०२६
Uncategorized

शारदीय नवरात्र २०२६ मध्ये तुळजाभवानी मातेची उपासना कशी करावी?

शारदीय नवरात्र हा आदिशक्तीच्या उपासनेचा पवित्र काळ मानला जातो. शारदीय नवरात्र २०२६ ची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने होणार आहे. या नऊ दिवसांत भाविक

नवरात्रीत तुळजापूरला जाण्याचा विचार आहे?
Uncategorized

नवरात्रीत तुळजापूरला जाण्याचा विचार आहे? दर्शनापूर्वी ही १० गोष्टी नक्की जाणून घ्या

नवरात्रीत तुळजापूरला दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर प्रवास सुरू करण्यापूर्वी दर्शन व्यवस्था, मंदिरातील सूचना, पूजेची तयारी, निवास आणि प्रवासाचे नियोजन करून जाणे महत्त्वाचे आहे.