श्री तुळजा भवानी मातेचा अंगा-याचे महत्त्व

Share This Post

श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात देविच्या दैनंदिन पुजामध्ये जेवढे हळदीकुंकुला महत्त्व आहे तेवढेच अनन्यसाधारण महत्त्व देविच्या अंगा-यालाही आहे.हिंदू धर्मशास्त्रानूसार अनादी काळापासून ऋषीमुनी, साधू, गोसावी व देविचे 16आणे भोपे पुजारी अंगाला भस्म/अंगारा लावूनच धार्मिक विधी करत असतात ही रूढी परंपरा आज आपणास पहावयास मिळते.भस्म महात्म्य,गुरूचरित्र,पद्मपुराण व शिवपुराण असे अनेक धार्मिक ग्रंथात भस्म व अंगाराबाबत माहिती मिळते.

श्री तुळजा भवानी मातेची दररोज(सकाळ व संध्याकाळ)असा दोन वेळा अभिषेक पुजा होत असतात.या दोन्ही वेळा त्या दिवशी ज्या 16आणे भोपे पुजारी यांची देविची सेवा करण्याची पाळी असते तो सर्व प्रथम दोन्ही वेळेस अंघोळ करून यावेळी धोतर घातले जात नाही तर रेश्मी सोवळे नेसून देविच्या अलंकारगृहातील कोरडा अंगारा आपल्या डाव्या हातांवरती घेवून ओला करून उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी आपल्या कपाळावर,ह्रदयास,नाभी,बाहूसंधी,खांद्यावर, पोटावरून व पाठीवरती आडवा अंगारा लावला जात. यावेळी तो भोपे पुजारी आदिशक्तीये नमः असे मत्र म्हणत असतो.त्यामुळे भोपे पुजारी यांचा देह व मनाची शुध्दी होते आणि आई तुळजा भवानी मातेची आपणावरती कृपा होते अशी श्रद्धा पुर्वापार काळापासून आज ही दिसून येते. त्यानंतरच देविची अभिषेक पुजेला सुरुवात होत असते.

अभिषेक पुजेनंतर देविला वस्त्र अलंकार नेसवून मळवट भरून श्रृंगार केला जातो,धुपारती व आरती होत असते, यावेळी मंदिरचे सेवेदारी तुकोजीबुवा व हमरोजीबुवा हे भोपे पुजारी यांना कोरडा अंगारा पात्रासह आणून देतात.तो अंगारा ओला करून देविला ओवाळून पाळीवाला भोपे पुजारी बोल भवानी माते की जय असे बोलून आपल्या कपाळी अंगारा लावतो.यानंतर तेथे उपस्थित इतर 16आणे भोपे पुजारी,सर्व सेवेदार मंडळी व भक्तास अंगारा पाळीवाला भोपे पुजारी कडून लावला जात असतो. दिवसातून दोन वेळा अंगारा निघत असतो.देविच्या दोन्ही अभिषेक पुजेनंतर हा अंगारा निघत असतो.

ज्या दिवशी देविचा छबिना उत्सव असतो त्या दिवशी पाळीवाला भोपे पुजारी अंगारा घेवून छबिना उत्सवात येत नाही तो पर्यंत छबिना उत्सव चालू होत नाही. यावेळी देविवरती भक्तास अंगारा कपाळी लावला जातो काहीजण हातांवरती घेवून आपल्या घरी नेतात.पुरूषांना कपाळावर अंगारा लावला जातो तर स्त्रियांचा आदर ठेवून त्यांच्या हातांवरती अंगारा दिला जात असतो.हा अंगारा कसा बनतो ते ही महत्त्वाचे आहे.

अहमदनगरचे भगत तेली यांच्या कडून दरवर्षी देविला सिमोल्लंघन खेळण्यास जी पालखी आणली जाते ती पालखी तसेच नगरचे पलंगे यांच्या कडून ही दरवर्षी देविस शारदीय नवरात्र महोत्सवानंतर विश्रांती घेण्याकरीता जो पलंग आणला जातो तो देविच्या होमकुंडात विसर्जन केले जात असते. तसेच देविच्या माळ परडी चे ही विसर्जन ही त्याच होमकुंडात होत असते यासर्वा पासूनच तो अंगारा केला जात असतो. या सर्व देविच्या महत्त्वाच्या वस्तू साक्षात देविचा सहवास व स्पर्श लागल्याने त्या अंगा-याची शक्ती बद्दल काय अजून सांगायचे. जगदंब ! जगदंब !! जगदंब !!!

More To Explore

Uncategorized

जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी : पूजा कशी कराल ? जन्मोत्सव कसा कराल ?

  दिनांक२६ ऑगस्ट सोमवार या दिवशीकृष्ण जन्माष्टमी आहे (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा दिवस ) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे .

Tulja Bhavani Mata Tuljapur
Uncategorized

अंबाई भक्त निवास येथे आरामदायी आणि सोयीस्कर निवास अनुभव | तुळजापूर

तुळजा भवानी मंदिराला भेट देण्याचा विचार करत आहात? आपल्या मुक्कामाला आरामदायी आणि अविस्मरणीय बनवा नवीन बांधकाम केलेल्या अंबाई भक्त निवास येथे आपले निवास बुक करून.

You cannot copy content of Tulja Bhavani Pujari